03 March 2021

News Flash

आयपीएलमध्ये वर्णद्वेषाचा सॅमीचा आरोप ठरला खरा, इशांत शर्माने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला होता उल्लेख

इशांतची इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ख्रिस गेल, डॅरेन सॅमी यांनीही या प्रकरणावर आपलं परखड मत मांडलं. ख्रिस गेलने, फुटबॉलमध्ये नाही तर क्रिकेटमध्येही खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो असं विधान केलं होतं. तर सॅमीने आयसीसीला या विरोधात भूमिका घेण्याचं आवाहन केलं. सॅमी आणि ख्रिस गेल यांनी आपल्याला खेळत असताना अनेकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचं जाहीर केलं. यानंतर डॅरेन सॅमीने आयपीएलमध्ये SRH संघाकडून खेळत असतानाही आपल्यावर वर्णद्वेषी टोमणे सहन करावे लागले असं म्हटलं होतं.

सॅमीने केलेल्या आरोपानंतर भारतात खळबळ माजली होती. इरफान पठाण, पार्थिव पटेल या भारतीय खेळाडूंनी सॅमीने केलेला आरोप फेटाळून लावला होता. सॅमीसोबत असा कुठलाही प्रकार घडल्याचं आठवत नसल्याचं मत पठाण आणि पटेल यांनी व्यक्त केलं होतं. मात्र सोशल मीडियावर टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माची एक जुनी इन्स्टाग्राम पोस्ट सध्या व्हायरल होते आहे. २०१४ सालच्या या पोस्टमध्ये इशांतने भुवनेश्वर कुमार, डॅरेन सॅमी, डेल स्टेन यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात इशांतने सॅमीचा उल्लेख काळू असा केला आहे.

 

View this post on Instagram

 

Me, bhuvi, kaluu and gun sunrisers

A post shared by Ishant Sharma (@ishant.sharma29) on

इशांतची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी इशांतला माफी मागण्याचा आग्रह करत आहेत. “मी आयपीएलमध्ये SRH कडून खेळत असताना मला काळू या नावाने हाक मारायचे. मला आता त्या शब्दाचा अर्थ कळतो आहे. मी आणि थिसारा परेराला संघात काळू नावाने बोलावलं जायचं. मला वाटलं हा कुठलातरी चांगला शब्द असेल.” हे समजल्यावर मला आणखीनच दुःख झाल्याचं सॅमीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 3:11 pm

Web Title: ishant sharmas 2014 instagram post on darren sammy slammed for casual racism psd 91
Next Stories
1 बलात्काराचे खोटे आरोप करत मला संघाबाहेर केलं – अख्तर
2 कुलदीप यादव मैदानात उतरला, रोज ४ तास करतोय नेट्समध्ये सराव
3 शेतातल्या बॉलिवूड डान्सवर वॉर्नर पती-पत्नी फिदा
Just Now!
X