News Flash

जर्मनीत भारतीय तरुणांचा डंका, जागतिक नेमबाजी स्पर्धेत दुसरा क्रमांक

भारतीय तरुण नेमबाजांचा जर्मनीत 'लक्ष्यवेध'

जर्मनीत भारतीयांची चमकदार कामगिरी

भारतीय संघाच्या नेमबाजी पथकाने जर्मनीमध्ये सुरु असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. ३ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य पदकासह भारतीय संघातल्या तरुण खेळाडूंनी पदरतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहे. ८ सुवर्णपदकांसह १९ पदकं जिंकून चीनने आपलं पहिलं स्थान अढळ ठेवलं आहे.

तरुणांच्या २५ मिटर पिस्तुल प्रकारात भारतीय संघाने सांघिक आणि वैय्यक्तिक सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली. भारताच्या पथकात अनिश भानवालाने अखेरच्या दिवसात केलेली कामगिरी भारताला दुसरं स्थान मिळवण्यात फायदेशीर ठरली. अनिशने या स्पर्धेत प्रत्येकी १ सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकलं आहे. याचसोबत अनिशने सांघिक प्रकारातही भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली. ही स्पर्धा इतकी चुरशीची झाली की रौप्य पदक मिळवलेला कोरिया आणि कांस्य पदक मिळालेला चीन हे भारताच्या अनुक्रमे १ आणि २ गुण पाठीमागे होते.

याचसोबत अनिशने वैय्यक्तित स्पर्धेत रौप्य पदकाचीही कमाई केली. युक्रेनच्या खेळाडूने अनिशपेक्षा केवळ १ गुण जास्त मिळवल्याने अनिशला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या खेळाडूला वैय्यक्तिक प्रकारात कांस्य पदक मिळालं.

महिलांच्या २५ मिटर पिस्तुल प्रकारात भारताच्या मुस्कानने ५७८ गुणांची कमाई करत अंतिम ८ जणांमध्ये प्रवेश केला. मात्र अंतिम फेरीतल्या तगड्या स्पर्धेपुढे तिचा निभाव लागला नाही. तरीही आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देत मुस्कानने ४० पैकी २४ गुण मिळवले. मात्र तिची ही कामगिरी भारताला पदक मिळवून देण्यात पुरेशी ठरली नाही. मुस्कानला या स्पर्धेत ४ थ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. मात्र मुस्कानने ही कसर सांघिक प्रकारात भरुन काढत भारतासाठी कांस्य पदक जिंकलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 12:01 pm

Web Title: issf junior world championship indian shooting squad finish 2nd in medal tally
Next Stories
1 भारतीय संघाला प्रशिक्षकपदाचा ‘प्रसाद’ मिळणार?
2 रवी शास्त्रींनी टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हावे ही तर सचिनची इच्छा!
3 भारतापुढे वेस्ट इंडिजचे आव्हान
Just Now!
X