28 October 2020

News Flash

गावस्कर यांच्या विशेष सत्काराचा मुद्दा ‘एमसीए’च्या बैठकीत

‘एमसीए’ची बैठक १४ ऑगस्टला होणार होती, परंतु ती चार दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

पोर्ट ऑफ स्पेन येथे १९७१मध्ये महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी केलेल्या कसोटी पदार्पणाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) उत्सुक आहे. ‘एमसीए’च्या कार्यकारी परिषदेच्या १८ ऑगस्टला होणाऱ्या बैठकीतील विषय पत्रिकेत या मुद्दय़ाचा समावेश करण्यात आला आहे.

‘एमसीए’ची बैठक १४ ऑगस्टला होणार होती, परंतु ती चार दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ६ मार्च, २०२१ या दिवशी गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची आमची योजना आहे, अशी माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली आहे. याचप्रमाणे ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याविषयीही या बैठकीत चर्चा करण्यात येईल. वानखेडे स्टेडियम क्रिकेट संग्रहालय बांधणे, अंकित चव्हाणची आजीवन बंदीसंदर्भातील पत्र, आदी विषयांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:13 am

Web Title: issue of gavaskars special honor was raised at the mca meeting abn 97
Next Stories
1 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लेपझिग प्रथमच उपांत्य फेरीत
2 १० सेकंदाच्या जाहीरातीसाठी १० लाख ! IPL प्रक्षेपण करणाऱ्या Star Sports ने आखलाय मेगाप्लान
3 IPL 2020 : Tata Sons स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत आघाडीवर??
Just Now!
X