२०१९ विश्वचषकानंतर महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब राहिलेला आहे. भारतीय निवड समितीने आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता ऋषभ पंतला संघात अधिकाधीक संधी मिळणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत पंत फलंदाजीत पुरता अपयशी ठरला. यानंतर धोनीला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान देण्याची मागणी व्हायला लागली. यावर धोनीने आपण नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुट्टीवर असल्याचं जाहीर केलं. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, पुनरागमनाबद्दलचा निर्णय धोनीलाच घेऊ दे असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“धोनी हा भारताच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. त्याला भारतीय संघात परतायचं आहे की नाही याचा निर्णय त्यालाच घेऊ दे. मी विश्वचषकानंतर त्याला भेटलो नाहीये. त्याला संघात पुनरागमन करायचं असेल तर त्याने पुन्हा खेळायला सुरुवात करायला हवी. माझ्या माहितीप्रमाणे त्याने अशी सुरुवात केलेली नाही. जर त्याला पुनरागमन करायंच असेल तर तो त्याबद्दलची माहिती निवड समितीला देईल.” शास्त्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. वेस्ट इडिज आणि पाठोपाठ आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत पंत अपयशी ठरला होता. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला विश्रांती देत वृद्धीमान साहाला संघात यष्टीरक्षणाची संधी देण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत धोनी भारतीय संघात पुनरागमन करेल असं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is for ms dhoni to decide whether he wants to come back says head coach ravi shastri psd
First published on: 09-10-2019 at 11:29 IST