कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रिया
वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत भारतीय संघाचा सलग दुसऱयांना पराभव झाला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा तब्बल १६१ धावांनी पराभव झाला. यावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आमच्यासाठी ‘खडतर दिवस’ होता असे स्पष्ट करत सामन्यात संघाची गोलंदाजी कमकुवत झाली असल्याचेही विराटने म्हटले. सामन्याचा नाणेफेक जिंकून कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु, श्रीलंकेच्या फलंदाजांनी तुफानी फलंदाजी केली. लंकेच्या सलामीच्या फलंदाजांनी २१३ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाज योग्य बुंध्यात गोलंदाजी करण्यात भारतीय संघाला अपयश आले आणि लंकेनी ५० षटकांत तब्बल ३४८ धावा ठोकल्या.
लंकेने उभारलेल्या धावांचा डोंगर पार करण्याच्या नादात भारतीय फलंदाजीही लडखडली. यावर त्यांनी फलंदाजी उत्तम केली. “आमच्यासाठी खराब दिवस होता. परंतु, हा पराभवामुळे आम्ही कुठे चुकलो? यावर लक्ष केंद्रीत करता येईल. मालिकेत आणखी दोन सामने खेळायचे आहेत. पुढच्या वेळेस संघ नक्की चांगली कामगिरी करेल” असेही विराट कोहलीने स्पष्ट केले.