News Flash

आयटीएफ टेनिस स्पर्धा : एकेरीत भारताच्या मनीष सुरेशकुमारचे आव्हान संपुष्टात

सेटमध्ये झेनने जोनाथनची दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये सव्र्हिस ब्रेक केली व हा सेट ६-१ असा जिंकून आघाडी घेतली

पुणे: ‘आयटीएफ’ चषक टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्ड व झेन खान यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यांचा पराभव करून अंतिम प्रवेश केला. तर, भारताच्या मनीष  सुरेशकुमारला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या झेन खान याने आपली विजयी मालिका कायम ठेवत स्वीडनच्या पाचव्या मानांकित जोनाथन म्रीधाचा ६-१, ७-५ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना २ तास १३मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये झेनने सुरेख खेळ करत वर्चस्व राखले. या सेटमध्ये झेनने जोनाथनची दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये सव्र्हिस ब्रेक केली व हा सेट ६-१ असा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या जोनाथनने दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला जोरदार खेळ करत दुसऱ्या गेममध्ये झेनची सव्र्हिस भेदली व स्वत:ची सव्र्हिस राखत ३-० अशी आघाडी घेतली. पण ही आघाडी जोनाथनला फार काळ टिकविता आली नाही. झेनने पाचव्या व नवव्या गेममध्ये जोनाथनची सव्र्हिस ब्रेक केली व सामन्यात ५-५ अशी बरोबरी साधली. झेनने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत पुढच्याच गेममध्ये जोनाथनची सव्र्हिस रोखली व स्वत:ची सव्र्हिस राखत हा सेट ७-५ असा जिंकून अंतिम फेरी गाठली.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या चौथ्या मानांकित ऑलिव्हर क्रॉफर्ड याने भारताच्या सहाव्या मानांकित मनीष सुरेशकुमारचा ६-४, ६-२ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना १तास २४ मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये पहिल्या गेममध्ये ऑलिव्हरने मनीषची, तर दुसऱ्या गेममध्ये मनीषने ऑलिव्हरची सव्र्हिस रोखली. त्यांनंतर पुढच्याच गेमला ऑलिव्हरने आपला रंगतदार खेळ सुरू ठेवत मनीषची पून्हा सव्र्हिस रोखली व सामन्यात ३-१अशी आघाडी घेतली. ऑलिव्हरच्या बिनतोड सव्र्हिससमोर मनीषची खेळी निष्प्रभ ठरली व हा सेट ऑलिव्हरने ६-४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येदेखील मनीषला सूर गवसला नाही व याचाच फायदा घेत ऑलिव्हरने तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सव्र्हिस ब्रेक केली व हा सेट ६-२ असा सहज जिंकून विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 12:08 am

Web Title: itf tennis tournament manish sureshkumar had to face defeat akp 94
Next Stories
1 विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारताची सर्वोत्तम कामगिरी
2 न्यूझीलंडचा बांगलादेशवर ६६ धावांनी विजय
3 विश्वाचषक पात्रता सामने : पोर्तुगाल, बेल्जियमची बरोबरी
Just Now!
X