प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामातील शतकी सामन्यात यजमान जयपूर पिंक पँथर्सने गुजरात फॉर्च्युनजायंटशी २८-२८ अशी बरोबरी साधली.
सवाई मानसिंग स्टेडियमवरील यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात जयपूर आणि गुजरात या दोन्ही संघांमधील बचावपटूंनी दिमाखदार खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे चढाईपटूंना संघर्ष करावा लागला. पहिल्या सत्रात जयपूरने १५-१० अशी आघाडी घेतली. परंतु उत्तरार्धात गुजरातने जोरदार मुसंडी मारत बरोबरी साधली. जयपूरकडून विशालने दिमाखदार खेळाचे प्रदर्शन केले, तर गुजरातकडून परवेश भन्सवाल आणि सचिन यांनी अप्रतिम खेळ केला.
दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धाने तमिळ थलायव्हाजचा ४२-२२ असा धुव्वा उडवला. या सामन्यात यूपी संघाकडून श्रीकांत जाधव (८ गुण) आणि सुरेंदर गिल (७ गुण) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. तमिळ संघाकडून राहुल चौधरी आणि व्ही. अजित कुमार यांनी प्रतिकार केला.
आजचे सामने
यू मुंबा वि. गुजरात फॉच्र्युनजायंट्स
जयपूर पिंक पँथर्स वि. बंगाल वॉरियर्स
वेळ : सायंकाळी ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2019 1:12 am