01 October 2020

News Flash

जयपूरची विजयाची बोहनी

सलग चार सामने गमावणाऱ्या जयपूर पिंकपँथर्स संघाला अखेर विजयाचा सूर गवसला. मंगळवारी जयपूरने बंगळुरू बुल्सवर ३६-२३ अशी मात करीत प्रो-कबड्डी लीगमध्ये पहिला विजय नोंदविला.

| July 30, 2015 12:51 pm

सलग चार सामने गमावणाऱ्या जयपूर पिंकपँथर्स संघाला अखेर विजयाचा सूर गवसला. मंगळवारी जयपूरने बंगळुरू बुल्सवर ३६-२३ अशी मात करीत प्रो-कबड्डी लीगमध्ये पहिला विजय नोंदविला.
गतविजेत्या जयपूरने पूर्वार्धात १९-१५ अशी आघाडी घेतली होती. १९ व्या मिनिटापर्यंत ते १०-१५ अशा गुणांनी पिछाडीवर होते. मात्र १९ व्या मिनिटाला त्यांच्या कुलदीप सिंगने एकाच चढाईत चार गुण नोंदविले व तेथूनच सामन्याला कलाटणी मिळाली. पाठोपाठ जयपूरने पहिला लोण नोंदवला. उत्तरार्धातही त्यांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट पकडी करीत बंगळुरूच्या मनजीत चिल्लर व राजेश मोंडाल यांना चांगलेच रोखून धरले. चिल्लर या हुकमी खेळाडूची अधिकाधिक वेळा पकड करीत त्याला बराच वेळ मैदानाबाहेर कसे ठेवता येईल, हे जयपूरने केलेले डावपेच यशस्वी ठरले.
जयपूरकडून कुलदीपने एका ‘सुपररेड’सह सात गुणांची कमाई केली. त्यामध्ये त्याने पकडीत मिळविलेल्या दोन गुणांचाही समावेश होता. जसवीर सिंगने चढाईत पाच व पकडीत तीन गुण मिळवीत अष्टपैलू कामगिरी केली. रोहित राणाने पकडीत पाच गुण मिळविले. बंगळुरू संघाकडून चिल्लरने सर्वाधिक चार गुण मिळविले.
जयपूरला पहिल्या चारही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यांच्या तुलनेत त्यांनी सुरेख सांघिक कौशल्य दाखवीत विजय मिळविला.
पाटणा पायरेट्सला घरच्या मैदानाचा फायदा मिळणार?
पाटणा पायरेट्सला प्रो कबड्डीमध्ये आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये फक्त एकमेव विजय मिळवता आला आहे. परंतु घरच्या मैदानावरील चार सामन्यांत राकेश कुमारच्या नेतृत्वाखालील पाटण्याचा संघ वर्चस्व राखणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पाटणा पायरेट्सचा गुरुवारी तेलुगू टायटन्ससोबत सामना होणार आहे. त्यानंतर अनुक्रमे दबंग दिल्ली, पुणेरी पलटण आणि बंगाल वॉरियर्ससोबत त्यांचे सामने होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:51 pm

Web Title: jaipur win the match
Next Stories
1 एमसीएच्या बैठकीत अंकितच्या विनंती अर्जावर चर्चा होणार
2 क्रीडा मंत्रालयातर्फे राष्ट्रीय युवा सल्लागार समिती
3 क्रिकेटपटूंवरील आजीवन बंदी उठवण्यास बीसीसीआयचा नकार
Just Now!
X