भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांची आगामी आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघाच्या मुख्य मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी मुंबई इंडियन्सच्या संचालिका नीता अंबानी म्हणाल्या,‘‘कुंबळे यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, तसेच त्यांनी संघटनात्मक स्तरावर केलेले काम लक्षात घेऊनच आम्ही त्यांची नियुक्ती केली आहे. ’’
या नियुक्तीचे स्वागत करीत कुंबळे म्हणाले,की माझ्या कारकिर्दीत मुंबई इंडियन्स संघातील युवा खेळाडूंच्या विकासावर भर दिला जाईल. या संघात अतिशय नावाजलेले खेळाडू आहेत. हा संघ आयपीएल स्पर्धेतील अव्वल दर्जाचा संघ आहे. त्याची ही प्रतिमा कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2013 12:16 pm