22 July 2019

News Flash

Ind vs Eng : अँडरसन एक्स्प्रेस सुसाट, शेवटच्या चेंडूवर मोडला ग्लेन मॅग्राचा विक्रम!

शेवटच्या चेंडूवर अँडरसनने शमीला बाद केले.

जेम्स अँडरसन

Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत सध्या अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने भारताच्या फलंदाजांना डावाच्या सुरुवातीला सळो की पळो करून सोडले. याच सामन्यात अँडरसनने दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्राचा विक्रम मोडला.

अँडरसनला कसोटी इतिहासातील सर्वाधिक बळी टिपणारा वेगवान गोलंदाज बनण्यासाठी केवळ हा सामना सुरु होण्याआधी ५ गड्यांची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅग्रा हा ५६३ बळींसह या वेगवान गोलंदाजांच्या यादीत अव्वल होता. त्यानंतर त्याने निवृत्ती स्वीकारली. अँडरसनने भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात अँडरसनने पहिल्या डावात २ तर दुसऱ्या डावात ३ बळी टिपले. आता अँडरसनच्या खात्यात ५६४ बळी आहेत.

काही दिवसांपूर्वी मॅग्राने अँडरसनबाबत एक मोठे विधान केले होते. मला अँडरसनबद्दल आदर आहे. अँडरसन हा आपला विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे जर अँडरसनने आपला विक्रम मोडला, तर त्याला कोणीही रोखू शकत नाही. अँडरसनने माझा विक्रम मोडला, तर मला आनंदच होईल, असेही तो म्हणाला होता.

First Published on September 11, 2018 10:37 pm

Web Title: james anderson breaks glenn mcgraths record
टॅग James Anderson