News Flash

इंग्लंडला धक्का, जेम्स अँडरसन अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर

पायाच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीनंतर अँडरसन इंग्लंडच्या संघाबाहेर

इंग्लंडला धक्का, जेम्स अँडरसन अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर

अ‍ॅशेस मालिकेत १-१ बरोबरी साधल्यानंतरही इंग्लंडच्या संघासमोरची विघ्न कमी होताना दिसत नाहीयेत. इंग्लंडचा आघाडीचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीमुळे अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता, याच सामन्यात अँडरसनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तो सामना मध्यावर सोडून ड्रेसिंग रुममध्ये परतला होता.

वैद्यकीय तपासणीत अँडरसनच्या पोटरीला दुखापत झाल्याचं निष्पन्न झालं. यावर उपचार करण्यासाठी अँडरसन इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रशिक्षक डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार घेत होता. मात्र तिसऱ्या कसोटीनंतरही अँडरसनच्या दुखापतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अँडरसन अ‍ॅशेस मालिकेत खेळू शकणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 7:03 pm

Web Title: james anderson has been ruled out of the rest of the ashes psd 91
टॅग : Ashes,James Anderson
Next Stories
1 निवड समिती ऋषभ पंतच्या कामगिरीवर नाराज? आफ्रिका दौऱ्यानंतर पर्याय तयार ठेवणार
2 देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करत राहीन, अर्जुन पुरस्कारानंतर रविंद्र जाडेजाची प्रतिक्रीया
3 “मेजर ध्यानचंदना भारतरत्न द्या म्हणून सरकारकडे भीक मागणार नाही”
Just Now!
X