27 September 2020

News Flash

अँडरसनचे ५०० बळी

लॉर्ड्सवर विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अँडरसनने हा टप्पा गाठला.

जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमधील ५०० बळी पूर्ण केले. 

वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटचा (४) त्रिफळा उडवून इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमधील ५०० बळी पूर्ण केले.  हा पराक्रम करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि जगातील सहावा गोलंदाज ठरला आहे.

लॉर्ड्सवर विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अँडरसनने हा टप्पा गाठला. ब्रेथवेटला बाद करताच अँडरसनच्या पराक्रमानंतर इंग्लिश संघाने त्याचे कौतुक केले, तर चाहत्यांनी उभे राहून मानवंदना दिली.

श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (८००), ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (७०८), भारताचा अनिल कुंबळे (६१९), ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (५६३) आणि वेस्ट इंडिजचा कोर्टनी वॉल्स (५१९) या पाचशे बळी मिळवणाऱ्यांच्या पंक्तीत आता ३५ वर्षीय अँडरसन सामील झाला आहे.

विंडीजच्या पहिल्या डावातील १२३ धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव १९४ धावांत आटोपला. त्यामुळे इंग्लंडला ७१ धावांची आघाडी मिळाली. केमार रोचने ७२ धावांत ५ बळी घेतले. मग विंडीजची दुसऱ्या डावातही ३ बाद ६९ अशी अवस्था झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2017 1:47 am

Web Title: james anderson picks 500th test wicket
टॅग James Anderson
Next Stories
1 मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक १० नोव्हेंबरला
2 Pro Kabaddi Season 5 – सलग दुसरा सामना बरोबरीत, उत्तर प्रदेशने गुजरातला रोखलं
3 ….तर आणखी १० वर्ष खेळेन – विराट कोहली
Just Now!
X