News Flash

ऑस्ट्रेलियाला धक्का; दुखापतीमुळे आघाडीचा वेगवान गोलंदाज संघाबाहेर

सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना

बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला अवघे तीन दिवस बाकी असताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. आघाडीचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला दुखपत झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला आराम देण्यात आला आहे. जेम्स पॅटिन्सन बरगड्यांना दुखापत झाली आहे. त्याची दुखपत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.

आणखी वाचा- तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघासाठी Good News

दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर जेम्स पॅटिन्सन कुटुंबासोबत सुट्ट्या साजऱ्या करत होता. त्यावेळी त्याच्या बरगड्यांना दुखपत झाल्याचं समोर आलं आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात पॅटिन्सनला अंतिम ११ मध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने त्याचा बदली खेळाडू म्हणून कुणालाही संधी न देण्याची घोषणा केली आहे. असे असले तरी, चौथ्या कसोटी सामन्यापुर्वी त्याच्या दुखापतीची माहिती घेतली जाईल.

आणखी वाचा- कठीण समय येता, बुमराह कामास येतो – सचिन तेंडुलकर

आणखी वाचा- रहाणेचा जन्मच नेतृत्व करण्यासाठी झाला; ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू झाला फिदा

सात जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सिडनी येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघानं मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. आता तिसऱ्या सामन्यात कोण बाजी मारतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 9:54 am

Web Title: james pattinson has been ruled out of the third ausvind test nck 90
Next Stories
1 तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघासाठी Good News
2 पाच खेळाडूंसह संपूर्ण भारतीय संघ आज सिडनीत
3 राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राकडे?
Just Now!
X