सध्या देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे सण-समारंभ, सोहळे, धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास मनाई आहे. कृष्णजन्म आणि गोकुळाष्टमीचा उत्साह देशभरात नेहमी दिसतो, पण यावर्षी त्यावर काही अंशी विरजण पडल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते युवराज सिंग साऱ्यांनी कृष्ण जन्माष्टमीच्या चाहत्यांना शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

जन्माष्टमीचा सण देश-विदेशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदाही ११ आणि १२ ऑगस्ट रोजी दरवर्षी प्रमाणे दोन दिवस जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. काही लोक श्रीकृष्णाची जयंती मंगळवारी तर काही १२ ऑगस्ट रोजी साजरी करतील. दोन दिवस चालणारा हा उत्सव खूप खास असतो. या दिवशी सामान्य माणसापासून सेलिब्रिटीपर्यंत जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. पण करोनाचा धोका लक्षात घेता भारतीय क्रिकेटपटूंनी यावेळी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.