08 March 2021

News Flash

जपान ओपन बॅडमिंटन – कॅरोलिना मरीनकडून सायना नेहवाल पराभूत

भारतीय महिलांचं आव्हान संपुष्टात

सरळ दोन सेट्समध्ये पराभव करत मरीनचा सायनावर विजय

जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिलांचं आव्हान आता संपुष्टात आलेलं आहे. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेच्या कॅरोलिना मरिनने सायना नेहवालचा २१-१६, २१-१३ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. याआधी झालेल्या सामन्यात जपानच्या नोझुमी ओकुहाराने पी. व्ही. सिंधूला पराभूत केलं होतं. त्यामुळे या स्पर्धेत भारतीयांची मदार आता पुरुष खेळाडूंवर आहे.

अवश्य वाचा – ओकुहाराकडून सिंधूचा धुव्वा, किदम्बी श्रीकांतची आगेकूच

पहिल्या सेटच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडू सावध पवित्रा घेऊन खेळत होत्या. अखेर मरीनने कोंडी फोडत सामन्यात आघाडी घेतली. मात्र सायनाने मरीनला पुन्हा टक्कर देत पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत ११-९ अशी आघाडी घेतली. मध्यांतरानंतरही काही काळ सायनाकडे आश्वासक आघाडी होती. मात्र मरीनने सायनाला पुन्हा धक्का देत १५-१५ अशी बरोबरी साधली. यानंतर आपल्या खेळाची गती वाढत कॅरोलिना मरीनने पहिला सेट २१-१६ च्या फरकाने जिंकत सामन्यात अनपेक्षितरित्या पुनरागमन केलं.

दुसऱ्या सेटमध्या सायना नेहवाल कॅरोलिना मरीनला पुन्हा कडवी टक्कर देईल असा अंदाज वर्तवला जात होता. याप्रमाणे पहिल्या काही मिनीटांमध्ये सायनाने सेटमध्ये आघाडीही घेतली होती. मात्र मरीनने पुन्हा एकदा सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करत सायनाला बॅकफूटवर ढकललं. कॅरोलिनाच्या आक्रमक खेळापुढे सायना नेहवाल गोंधळलेली पहायला मिळाली. याचा फायदा घेत कॅरोलिनाने दुसरा सेट २१-१३ च्या फरकाने जिंकत सामन्यात बाजी मारली. सायना नेहवालच्या या पराभवामुळे जपान ओपन स्पर्धेत भारतीयांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे पुरुष खेळाडूंच्या कामगिरीवर या स्पर्धेतलं भारतीयांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 5:45 pm

Web Title: japan open badminton 2017 rio olympic gold medal winner carolina marin beat saina nehwal
टॅग : Saina Nehwal
Next Stories
1 बंगालच्या जेवणावर कांगारु नाराज!
2 ओकुहाराकडून सिंधूचा धुव्वा, किदम्बी श्रीकांतची आगेकूच
3 कुलदीप यादवच्या जाळ्यात कांगारु अडकले, भारत ५० धावांनी विजयी
Just Now!
X