करोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतामध्येही अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून अनेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र जपान ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडेल असा निर्धार व्यक्त केला आहे.

करोनामुळे जगभरात आतापर्यंत अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या मतानुसार ही परिस्थिती फारशी गंभीर नाही. ऑलिम्पिकचं आयोजन हे ठरलेल्या वेळेनुसारच होईल असं आबे यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑलिम्पिकचं आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकलावं अशी मागणी केली होती, मात्र ऑलिम्पिक समिती सदस्यांशी चर्चा केल्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल असं शिंजो आबे यांनी स्पष्ट केलंय.