करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी तब्बल ४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. ८ जुलैपासून साऊदम्पटन येथे विंडीज विरुद्ध इंग्लंड यांच्यात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली विंडीज संघाने यजमान इंग्लंडवर ४ गडी राखत मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. कर्णधार जेसन होल्डरने या सामन्यात आपली चमक दाखवली.

पहिल्या डावात होल्डरने इंग्लंडच्या ६ फलंदाजांना माघारी धाडत यजमानांचा पहिला डाव २०४ धावांत गुंडाळला. दुसऱ्या डावातही होल्डरने आश्वासक मारा केला. या कामगिरीचा फायदा होल्डरला आयसीसी क्रमवारीत झाला आहे. सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत होल्डरने न्यूझीलंडलच्या निल वॅगनरला मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं. ८६२ गुणांसह होल्डर दुसऱ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ९०४ गुणांसह अव्वल स्थान कायम राखून आहे.

अशी आहे आयसीसी सर्वोत्तम गोलंदाजांची क्रमवारी –

१) पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – ९०४ गुण

२) जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) – ८६२ गुण

३) निल वॅगनर (न्यूझीलंड) – ८४३ गुण

४) टीम साऊदी (न्यूझीलंड) – ८१२ गुण

५) कगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) – ८०२ गुण

६) मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – ७९७ गुण

७) जसप्रीत बुमराह (भारत) – ७७९ गुण

८) ट्रेन्ट बोल्ट (न्यूझीलंड) – ७७० गुण

९) जोश हेजलवूड (ऑस्ट्रेलिया) – ७६९ गुण

१०) जेम्स अँडरसन (इंग्लंड) – ७६७ गुण

याव्यतिरीक्त अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही होल्डरने ४८५ गुणांसह अव्वल स्थान कायम राखल आहे. या मालिकेतला दुसरा सामना १६ ते २० जुलै दरम्यान ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर रंगणार आहे.