जसप्रीत बुमराहने गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून आपलं स्थान पक्क केलं आहे. त्याच्या अनोख्या शैलीमुळे भलेभले फलंदाज हे बुचकळ्यात पडतात. याचसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराह ज्या पद्धतीने यॉर्कर चेंडू टाकतो त्याला तोड नाही, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मात्र त्याची हीच शैली भविष्यकाळात त्याला धोकादायक ठरू शकते. बुमराहला पाठीचा विकार जडू शकतो असं मत व्यक्त केलं आहे, प्रसिद्ध डॉक्टर सायमन फेरोस यांनी.  डॉ. फेरोस हे सध्या प्रसिद्ध फिजीओथेरपिस्ट जॉन ग्लोस्टर यांच्यासोबत ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियामध्ये डिकीन विद्यापीठात कार्यरत आहेत.

अवश्य वाचा – मोहालीच्या मैदानात ‘गब्बर-हिटमॅन’ची जोडी ठरली सरस

‘बुमराह फ्रंट फूट लाईनच्या बाहेर चेंडू रिलीज करतो. याचा अर्थ तो चेंडूला पुश करू शकतो. त्यामुळे तो उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी चांगला इन स्विंग चेंडू टाकू शकतो. जर त्याने ४५ अंशापेक्षा अधिक वाक दिला (माझ्या मते तो काही वेळा तसे करतो) तर त्याच्या शैलीमुळे त्याच्या पाठीच्या खालच्या भागाला दुखापत होण्याची समस्या उद्भवू शकते’, डॉ. फोरेस बोलत होते.

अवश्य वाचा – मॅचफिक्सींग खुनापेक्षा भयंकर अपराध – महेंद्रसिंह धोनी

“मज्जारज्जूचा खालचा भाग आणि खांद्याच्या हालचालीसह त्याची चेंडू टाकण्याची शैली बघितल्यानंतर बुमरहाची शैली सुरक्षित भासते. त्यामुळे त्याच्या मणक्यावर अतिरिक्त दबाव येत नाही.” डॉ. फेरोस यांनी बुमराहच्या गोलंदाजी शैलीचं विश्लेषण केलं. ग्लोस्टर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या १७ वर्षांपासून कार्य करीत आहेत. साडेतीन वर्षे ते भारतीय संघाचे फिजिओ होते. 55 आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरे व मालिकांमध्ये मुख्य फिजीओथेरपिस्ट म्हणून काम करण्याचा अनुभव डॉ. फोरेस यांच्याकडे आहे.