News Flash

बुमराहच्या ‘कमबॅक’ फोटोवर ‘हॉट’ क्रिकेटपटूची कोपरखळी

बुमराहने दुखापतीतून सावरल्यानंतर जिममध्ये व्यायाम करतानाचा फोटो शेअर केला आहे

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या पाठीच्या दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून दूर होता. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेला त्याला मुकावे लागले होते. पण आता मात्र बुमराह दुखापतीतून हळूहळू सावरत असून तो आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊ लागला आहे. बुमराहने आपल्या ट्विटर अकाऊंटवर जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक फोटो पोस्ट करत भारतीय संघात पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

Coming soon!

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1) on

जसप्रीत बुमराह पुन्हा मैदानावर परतणार म्हणून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. बुमराहच्या पोस्टवर त्याच्या चाहत्यावर्गाने विविध कमेंट केल्या. या पोस्टवर ‘हॉट’ क्रिकेटपटू म्हणून ओळखली जाणारी इंग्लंडची डॅनियल वॅट हिने कमेंट केली आहे. बुमराह जे वर्कआऊट करतोय ते फारच छोटेखानी आहे. तो जे ‘वेट्स’ उचलून व्यायाम करतो आहे, ते अत्यंत कमी वजनाचे आहेत, असे तिने कमेंटमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. बुमराहच्या पाठीच्या दुखापतीला शस्त्रक्रियेची गरज लागणार नसल्याचं समोर आलं होतं. विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी मालिकेदरम्यान बुमराहला ही दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळालेलं नव्हतं. आपल्या पाठीच्या दुखण्यावर उपचारासाठी बुमराह बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकासोबत इंग्लंडलाही गेला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत बुमराहला दुखापतीमुळे संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रियेची गरज नसल्याचा अहवाल दिल्यानंतर, आगामी काळात बुमराह संघात लवकरच पुनरागमन करु शकतो. २०२० साली भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनीही बुमराहच्या तब्येतीच्या घडामोडींवर समाधान व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 5:31 pm

Web Title: jasprit bumrah comeback photo coming soon hot woman cricketer danielle wyatt comment instagram vjb 91
Next Stories
1 मी पुन्हा येतोय, जसप्रीत बुमराहने दिले पुनरागमनाचे संकेत
2 Dhoni Retires! एका हॅशटॅगमुळे धोनीचे चाहते झाले भावनिक
3 दिल्लीतल्या पहिल्या टी-२० सामन्यावर अतिरेकी हल्ल्याचं सावट, भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ
Just Now!
X