भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला. ३२ वर्षांपासून अबाधित असलेला ऑस्ट्रेलियाचा गाबाचा गड भारतीयांनी सर केला. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली नव्या दमाच्या टीम इंडियाने प्रतिभावान ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. जसप्रीत बुमराहने सुरूवातीच्या तीन सामन्यांत दमदार कामगिरी केली. पण नंतर दुखापतीमुळे त्याला चौथ्या सामन्यातून माघारी घ्यावी लागली. दमदार विजय नोंदवून भारतीय संघ मायदेशात परतला. पण त्यानंतर बुधवारी मात्र बुमराहने एक भावनिक ट्विट केले.

रोहित शर्माची भावनिक पोस्ट; म्हणाला, “तुझी उणीव भासेल…”

भारताची आगामी क्रिकेट मालिका इंग्लंडविरूद्ध मायदेशातच असणार आहे. त्यानंतर IPLच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. या हंगामासाठी लवकरच लिलाव केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं BCCIला दिली. त्यात मुंबईच्या संघाने लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याला करारमुक्त करण्यात आले. त्यानंतर बुमराहने ट्विट करत आपल्या भावनांना वाट करून दिली. “इतक्या वर्षे तुझ्या साथीने क्रिकेटच्या मैदानावर खेळलो याचा मला अभिमान आहे. तुझी विचार करण्याची शैली तू मला शिकवलीस त्यासाठी तुझे खूप आभार, माली (मलिंगा). तुझ्या समृद्ध अशा कारकिर्दीतसाठी तुझं अभिनंदन. आता तू नसल्याने IPL मधील गोष्टी पूर्वीसारख्या नसतील”, असा भावनिक ट्विट त्याने आपल्या अकाऊंटवरून केले.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सिराज विमानतळावरून थेट दफनभूमीत

मुंबईने राखून ठेवलेले खेळाडू-

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान

संघातून करारमुक्त केलेले खेळाडू

लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेनेघन, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर-नाईल, शेरफाने रूदरफर्ड, प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख