News Flash

भारतीय गोलंदाजांमध्ये बुमराहचा सामना करणं सर्वात कठीण !

ऑस्ट्रेलियन फलंदाजाने दिली कबुली

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या भारतीय क्रिकेट संघ कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळत नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झालेली असली तरीही, आयपीएलचा तेरावा हंगाम हा बीसीसीआयसमोरचं पहिलं प्राधान्य असणार आहे. वर्षाअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. आर्थिक अडचणीत सापडलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी भारतीय संघाचा हा दौरा महत्वाचा आहे. २०१८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कांगारुंना त्यांच्यात मैदानावर हरवलं होतं. दोन वर्षांत ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल घडलेला असला तरीही दोन्ही संघातली मालिका रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेनच्या मते भारतीय गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहचा सामना करणं सर्वात कठीण आहे.

“भारतीय संघाकडे खूप चांगले गोलंदाज आहेत, पण माझ्यामते बुमराहचा सामना करणं सर्वात कठीण आहे. सातत्याने १४० च्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. खेळपट्टी आणि वातावरण जेव्हा पोषक असतं तेव्हा तो चेंडू चांगला स्विंग करतो. यॉर्कर चेंडू टाकण्यातही तो माहीर आहे. अशा सर्वोत्तम गोलंदाजासमोर फलंदाजी करणं कोणालाही आवडेल. जसप्रीत हा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत लाबुशेनने आपलं मत मांडलं.

ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता…टी-२० विश्वचषकाचं आयोजन करणं अशक्य असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याआधीच जाहीर केलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये आयसीसी याबद्दल आपला अंतिम निर्णय जाहीर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 6:18 pm

Web Title: jasprit bumrah is hardest to face among india bowlers says marnus labuschagne psd 91
Next Stories
1 BCCI जनरल मॅनेजर साबा करीम यांचा राजीनामा
2 Eng vs WI : तिसऱ्या कसोटीसाठी जोफ्रा आर्चर उपलब्ध
3 Eng vs WI : मधलं बोट दुमडून स्टोक्सच्या सेलिब्रेशन करण्यामागचं कारण माहिती आहे??
Just Now!
X