02 March 2021

News Flash

Video : दुखापतीनंतर बुमराह सज्ज, भन्नाट यॉर्करने उडवला त्रिफळा

रविवारपासून भारत-श्रीलंका मालिकेला सुरुवात

२०२० वर्षात भारतीय संघ आपली पहिली मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारी पासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झालेली असून दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहने पुनरागमन केलंय.

गेले काही महिने बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. दरम्यानच्या काळात उपचार घेतल्यानंतर, बुमराहने जोरदार सराव करत संघात स्थान मिळवलं आहे. पहिल्या टी-२० सामन्याआधी सरावादरम्यान, बुमराहने आपलं ठेवणीतलं अस्त्र वापरत (यॉर्कर चेंडूने) स्टम्प उडवला. बीसीसीआयने बुमराहच्या या सरावाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 11:49 am

Web Title: jasprit bumrah makes strong comeback practice very hard ahead of 1st t20i against sri lanka psd 91
टॅग : Jasprit Bumrah
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा १९४ धावांत खुर्दा
2 ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी मालिका : लबूशेनकडून नववर्षांचे शतकी स्वागत
3 टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पिस्तूल, रायफल प्रकारात पदकांची हमी!
Just Now!
X