30 October 2020

News Flash

Video : रोहितची चिमुरडी करतेय बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवस लॉकडाऊन जाहीर केलं आहे. या काळात आयपीएलसह सर्व महत्वाच्या स्पर्धा बंद असल्यामुळे भारतीय संघाचे सर्व खेळाडू घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट केलं. यादरम्यान रोहितची मुलगी समायराने बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल केली.

जसप्रीत बुमराहने आपल्या कर्णधाराच्या लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर मुंबई इंडियन्सने आपल्या संघात आणखी एक यॉर्कर स्पेशलिस्ट बॉलर येतोय अशी कमेंट केली आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी समायराचा फॅन झाल्याचंही जसप्रीत बुमराहने आपल्या व्हिडीओत म्हटलंय. दरम्यान बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कार्यकाळात आयपीएल खेळवण्याचा विचार आहे. मात्र यासाठी बीसीसीआयला आयसीसीच्या दरबारी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 7:44 pm

Web Title: jasprit bumrah post rohit daughter video copying his bowling style on social media psd 91
Next Stories
1 आधी फिंच-एबी आणि विराटला बाद करा, मग मला बॉलिंग करण्याची स्वप्न बघा !
2 करोनाशी लढा : शाहबाज नदीमने स्वीकारली ३५० कुटुंबांची जबाबदारी, स्वतः करतोय अन्नदान
3 कोलकात्याचा महागडा खेळाडू पॅट कमिन्स म्हणतो, आयपीएल सुरु व्हावं ही प्रत्येकाची इच्छा !
Just Now!
X