News Flash

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दौऱ्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती

मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौलला संघात स्थान

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत आपल्या गोलंदाजीने कांगारुंना सळो की पळो करुन सोडणाऱ्या जसप्रीत बुमराहला, आगामी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेतून विश्रांती देण्यात आलेली आहे. बुमराहच्या जागी वन-डे संघात हैदराबादच्या मोहम्मद सिराजला तर न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी पंजाबच्या सिद्धार्थ कौलला संघात जागा देण्यात आली आहे.

अवश्य वाचा – अहमदाबादेत उभं राहतंय जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान

मे महिन्याच्या अखेरीस इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक लक्षात घेता प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याची मागणी विराट कोहलीने केली होती. यानुसार बुमराहवर गेल्या काही दिवसांमध्ये अति क्रिकेटमुळे येणारा भार लक्षात घेता बीसीसीआयने त्याला विश्रांती देण्याचं ठरवलं आहे. फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे, तोपर्यंत बुमराहला विश्रांती मिळणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलिल अहमद, मोहम्मद शमी

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौल, खलिल अहमद

अवश्य वाचा – तुमचा माज घरी सोडून या ! विराटचा ऑस्ट्रेलियन संघाला सल्ला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 11:46 am

Web Title: jasprit bumrah rested for odi series against australia and nz tour
Next Stories
1 तुमचा माज घरी सोडून या ! विराटचा ऑस्ट्रेलियन संघाला सल्ला
2 2019 विश्वचषकसाठी ऋषभ पंतचा नक्की विचार होईल – एम. एस. के. प्रसाद
3 अहमदाबादेत उभं राहतंय जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान
Just Now!
X