27 February 2021

News Flash

न्यूझीलंडच्या फलंदाजांनी घेतलाय जसप्रीत बुमराहचा धसका

मार्टीन गप्टीलने व्यक्त केली अजब इच्छा

जसप्रीत बुमराहचं अपयश - भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या लौकीकास साजेशी गोलंदाजी करू शकला नाही. न्यूझीलंडविरोधतच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात बुमराहला एकही बळी घेता आला नाही. तसेच डेथ ओव्हरमध्ये बुमराहाला आपली छाप सोडता आली नाही. दुसऱ्या सामन्यात पहिल्या सहा षटकात बुमराहनं ३७ धावा दिल्या होत्या. सामना संपल्यानंतर बुमराहने दहा षटकांत ६४ धावा खर्च केल्या होत्या.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली आहे. ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-० ने आघाडीवर आहे. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी आश्वासक कामगिरी केली. जसप्रीत बुमराने धडाकेबाज कामगिरी करत न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश ठेवण्याचं काम केलं आहे. बुमराहच्या गोलंदाजीचा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलाच धसका घेतला आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टीलने, पुढील ३ सामन्यांत बुमराहचा फॉर्म हरवेल अशी आम्हाला आशा आहे.

“जसप्रीत बुमराह अखेरच्या षटकांतला सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्याकडे धीम्या गतीने चेंडू टाकण्याची आणि बाऊन्सर टाकण्याची क्षमताही आहे. त्यामुळे तुम्ही बुमराहला टाळू शकत नाही. आम्ही एवढीच आशा करु शकतो की पुढील ३ सामने बुमराहसाठी वाईट ठरतील”, दुसरा सामना संपल्यानंतर गप्टील पत्रकारांशी बोलत होता.

न्यूझीलंड दौऱ्यात टी-२० मालिकेतनंतर भारतीय संघ ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतला तिसरा सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – गोलंदाजांनी सामना जिंकवला, सामनावीराचा पुरस्कार लोकेश राहुलला का??

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 3:42 pm

Web Title: jasprit bumrah to have 3 bad games martin guptill has unusual wish for pacer after indias win over nz psd 91
Next Stories
1 ऋषभ पंत लवकरच भारतीय संघात पुनरागमन करेल !
2 योग्य व्यक्तींना नेहमी डावललं जातं ! पद्म-पुरस्कार यादीत नाव न आल्याने कुस्तीपटू विनेश फोगाट नाराज
3 मांजरेकर म्हणतात, सामनावीर गोलंदाज असायला हवा ! रविंद्र जाडेजाने दिलं भन्नाट उत्तर…
Just Now!
X