News Flash

बुमराहच्या पुनरागमनाचा मुहूर्त ठरला?? न्यूझीलंड दौऱ्यात संघात स्थान मिळण्याची शक्यता

निवड समिती प्रमुख प्रसाद यांची माहिती

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर बांगलादेशवर मात केली. टी-२० मालिकेत २-१ आणि कसोटी मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवला. जसप्रीत बुमराह गेले काही दिवस आपल्या पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. निवड समितीचे प्रमुथ एम.एस.के. प्रसाद यांनी बुमराहच्या भारतीय संघातील पुनरागमनाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

अवश्य वाचा – धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत

“जसप्रीत हळूहळू आपल्या जुन्या फॉर्मात परततो आहे. मात्र अद्यापही त्याच्या दुखापतीबद्दल अंतिम अहवाल आम्हाला मिळायचा आहे. पुढच्या महिन्यापर्यंत तरी तो भारतीय संघात परतत नाहीये हे नक्की, मात्र न्यूझीलंड दौऱ्यासाठी तो संघात परतू शकतो”, प्रसाद पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, बांगलादेशविरुद्धचा कसोटी सामना हा २०१९ वर्षातला भारतीय संघाचा हा अखेरचा कसोटी सामना होता. यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळेल. यानंतर २०२० साली भारतीय संघ जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

अवश्य वाचा – ICC Test Ranking : आश्विनचं स्थान वधारलं, जसप्रीत बुमराहची घसरण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 5:18 pm

Web Title: jasprit bumrah to return for new zealand tour msk prasad opens up on speedsters comeback psd 91
Next Stories
1 ICC Test Ranking : आश्विनचं स्थान वधारलं, जसप्रीत बुमराहची घसरण
2 IPL पर्यंत वाट बघा, धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर रवी शास्त्रींचं सूचक विधान
3 धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत
Just Now!
X