News Flash

आफ्रिकेविरुद्ध लढतीआधी जसप्रीत बुमराहची उत्तेजक द्रव्य चाचणी

वाडाकडून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उत्तेजक द्रव्य चाचणी करण्यात आली.

भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या लढतीची तयारी करत असताना सोमवारी वाडाकडून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उत्तेजक द्रव्य चाचणी करण्यात आली. रोज बाऊल स्टेडियमवर भारतीय संघाचा सराव सुरु असताना उत्तेजक नियंत्रक अधिकारी बुमराहला उत्तेजक द्रव्य चाचणीसाठी घेऊन गेले.

ही चाचणी दोन प्रकारची होती. पहिल्या राऊंडमध्ये बुमराहची आधी युरीन टेस्ट करण्यात आली. त्यानंतर ४५ मिनिटांनी जसप्रीत बुमराहचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जागतिक उत्तेजक विरोधी संस्था वाडाकडून क्रिकेटपटूंची उत्तेजक द्रव्य चाचणी केली जाते.

जसप्रीत बुमराहची उत्तजेक द्रव्य चाचणी करण्यात आल्याच्या वृत्ताला बीसीसीआयमधील सूत्रांनी दुजोरा दिला आहे. आणखी अन्य कुठल्या खेळाडूची अशीच चाचणी होणार आहे का? ते बीसीआयमधील सूत्रांनी सांगितलेले नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 9:07 am

Web Title: jasprit bumrah undergoes doping test wada south africa clash world cup 2019
Next Stories
1 कार्डिफवर आशियाई द्वंद्व!
2 दुखापतग्रस्त एन्गिडी भारताविरुद्धच्या सामन्याला मुकणार
3 विश्वचषक डायरी : राजकारण प्रवेश, मात्र विश्वचषकानंतर!
Just Now!
X