पाकिस्तान क्रिकेट संघाच्या गेल्या काही मालिकांमध्ये निराशाजनक कामगिरीचे खापर पाकचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी पाक क्रिकेट बोर्डाने नियुक्त केलेल्या परदेशी प्रशिक्षकांवर फोडले आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने पाक संघामध्ये सुधारणा करण्यासाठीच्या दृष्टीकोनातून लाहोरमध्ये दोन दिवसीय बैठकीचे आयोजन कण्यात आले असून यामध्ये पाकच्या माजी क्रिकेटपटूंना आमंत्रित करण्यात आले आहे. पण पाक क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या या पुढाकारावरही त्यांनी टीका केली. मियाँदाद म्हणाले की, पाक बोर्डाने आयोजित केलेल्या विचार बैठकीची मला कल्पना देखील नाही. वर्तमान पत्रात आलेल्या बातमीतून मला याची माहिती मिळाली. आमंत्रितांमध्ये आपल्यालाही बोलविण्यात आल्याचेही बातमीत नमूद करण्यात आलेले आहे. पण पाक बोर्डाकडून अद्याप माझ्याकडे कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही. संघाच्या प्रशिक्षकपदासाठी कोट्यवधी पैसा खर्चून विदेशी प्रशिक्षक नेमणाऱया बोर्डाची बैठक मला अजिबात महत्त्वाची वाटत नाही.

 

Mumbai mnc Security Force Recruitment
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलात लवकरच भरती, सुरक्षा अधिकाऱ्यांची १४०० पदे भरणार
Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
security guards daughter graduates from uk college celebrities react emotional viral video
“अशक्यही शक्य करतो तो बाप!” सुरक्षा रक्षकाने लेकीला शिक्षणासाठी पाठवले परदेशात; सेलेब्सने केले कौतुक, Video Viral
security guards daughter who graduated from UK college A video showing the emotional journey
बाबा सुरक्षा रक्षक; तरीही लेकीने मोठ्या जिद्दीने परदेशात केले शिक्षण पूर्ण; पाहा बाबा-लेकीचा हृदयस्पर्शी VIDEO

परदेशी प्रशिक्षक आणि सपोर्ट टीममुळे पाकिस्तानच्या संघाचे मोठे नुकसान झाले आहे. पाकच्या सध्याच्या परिस्थितीसाठी परदेशी प्रशिक्षक जबाबदार आहेत. त्यामुळे पाकच्या माजी क्रिकेटपटूंसोबत चर्चा घडवून आता काय उपयोग? असा सवाल मियाँदाद यांनी उपस्थित केला. माजी क्रिकेटपटूंसोबतच्या चर्चा बैठकीचे आयोजन पाकच्या खराब कामगिरीमुळे निराश झालेल्या चाहत्यांना आणि टीकाकारांची फसवणूक करण्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाने केलेली ही खेळी असल्याचेही मियाँदाद म्हणाले.