भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत विश्वविक्रम रचण्याचा मान पटकाविला आहे. पोलंड येथील आयएएफ वर्ल्ड अंडर-२० मधील भालाफेक स्पर्धेत नीरजने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. त्याने ८६.४८ मीटर अंतरावर भाला फेकून ज्यूनियर गटात नवा विश्वविक्रम रचला.
अॅथलेटीक्समध्ये विश्वविक्रम रचणारा नीरज पहिला भारतीय क्रीडापटू ठरला आहे तसेच वर्ल्ड अॅथलेटीक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळवणाराही तो पहिला भारतीय क्रीडापटू आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोहान ग्रोबरलने ८०.५९ मीटर अंतरावर भाला फेकून दुसरे स्थान पटकावले. तर ७०.६५ मीटर अंतरावर भाला फेकत ग्रॅनाडाच्या अॅन्डरसन पीटर्सला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. हरियाणाच्या नीरजने पहिल्या फेरीत ७९.६६ मीटर अंतरावर भाला फेकून सुरुवात केली. पहिली फेरी संपेपर्यंत तो ग्रोबरलपेक्षा मागे होता. मात्र, दुस-या प्रयत्नात नीरजने ८६.४८ मीटर अंतरावर भाला फेकून विश्वविक्रमाला गवसणी घातली. यापूर्वीचा ज्यूनियर गटातील विश्वविक्रम लाटव्हीयानच्या झिगीसमुंड सिरमायसच्या नावावर होता. त्याने २०११ मध्ये ८४.६९ मीटर अंतरावर भाला फेकला होता.  नीरजने त्याच्या या विक्रमाने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता केशॉर्न वॉलकॉट यालाही मागे टाकले आहे. त्याने याच वर्षी ८६.३५ मीटर अंतरावर भालाफेक केली होती.

Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Shubman Gill Surpasses Virat Kohli and Sanju Samson in Unique Record
IPL 2024: शुबमन गिलने विराट-सॅमसनला मागे टाकत रचला इतिहास, आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज