भारताचा दिव्यांग भालाफेकपटू संदीप चौधरीने जकार्तात सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. संदीपने अंतिम फेरीमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 60.01 मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. श्रीलंकेच्या चामिंडा संपथ हेट्टीला रौप्य तर इराणच्या ओमिदी अलीने कांस्य पदकाची कमाई केली. रविवारी याच स्पर्धेत भारताने दोन रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई केली होती. 49 किलो वजनीगट पॉवरलिफ्टींग प्रकारात फरमान बाशाने रौप्य तर परमजीत कुमारने कांस्यपदकाची कमाई केली. जलतरण प्रकारात भारताच्या देवांशीने 100 मी. बटलफ्लाय प्रकारात रौप्य तर पुरुषांमध्ये सुयश जाधवने 200 मी. प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली आहे.
अवश्य वाचा – कोल्हापूरचा मावळा युथ ऑलिम्पिकमध्ये चमकला, शाहु मानेला नेमबाजीत रौप्यपदक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 8, 2018 3:35 pm