भारताचा भालाफेकपटू शिवपाल सिंह आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. नीरज चोप्रानंतर टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलेला शिवपाल हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. पात्रता फेरीत ऑलिम्पिक तिकीट मिळवण्यासाठी ८५ मी. चं अंतर पार करण्याची अट होती. शिवपालने ८५.४७ मी. लांब भाला फेकत टोकियोचं तिकीट मिळवलं.

गेल्या वर्षी दोहा येथे पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही शिवपालने ८६.२३ मी. अशी सर्वोत्तम कामगिरी केली होती. याच स्पर्धेत भारताचा आकाशदीप सिंह देखील सहभागी झाला होता, मात्र त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. दरम्यान शिवपाल व्यतिरीक्त २० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत के.टी. इरफान आणि ३ हजार मि. स्टिपलचेस – ४ * ४०० रिले या दोन प्रकारात महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.