28 February 2021

News Flash

आयसीसी बैठकीत बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी जय शहांवर

अध्यक्ष सौरव गांगुलीने केली घोषणा

बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शहा यांच्या खांद्यावर आता आणखी एक नवीन जबाबदारी आलेली आहे. आयसीसीच्या यापुढील बैठकींमध्ये जय शहा बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व करणार आहेत.

अवश्य वाचा – BCCI मध्ये दादाचा कार्यकाळ वाढणार?? लोढा समितीच्या शिफारसीत बदल करण्यावर एकमत

२३ ऑक्टोबर रोजी सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र सांभाळली. याचवेळी जय शहा यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी आली. रविवारी मुंबईत बीसीसीआय मुख्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत अध्यक्ष सौरव गांगुलीने, आयसीसी बैठकीत जय शहा बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व करेल असं स्पष्ट केलं.

सौरव गांगुलीच्या हातात बीसीसीआयची सुत्र येण्याआधी, सर्वोच्च न्यायालयाची क्रिकेट प्रशासकीय समिती बीसीसीआयचा कारभार सांभाळत होती. त्यामुळे संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आयसीसी बैठकीत बीसीसीआयची बाजू मांडत होते. मात्र संघटनेच्या नेतृत्वात बदल झाल्यानंतर आता ही जबाबदारी जय शहांकडे आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 8:38 am

Web Title: jay shah to represent bcci at icc cec meeting psd 91
Next Stories
1 यासिरच्या शतकानंतरही पाकिस्तान पराभवाच्या छायेत
2 रूट, बर्न्‍सच्या शतकांनी इंग्लंडला सावरले
3 मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धा : कर्नाटकचे सलग दुसरे विजेतेपद
Just Now!
X