18 February 2019

News Flash

व्हिएतनाम खुली बॅडमिंटन स्पर्धा : मिथुन, जयराम उपांत्य फेरीत दाखल

हो चि मिन्ह सिटी : भारताच्या अजय जयराम व मिथुन मंजुनाथ यांनी सनसनाटी विजय मिळवित व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीत उपांत्य फेरी गाठली. जयराम याने कॅनडाच्या

मिथुन मंजुनाथ आणि अजय जयराम

हो चि मिन्ह सिटी : भारताच्या अजय जयराम व मिथुन मंजुनाथ यांनी सनसनाटी विजय मिळवित व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीत उपांत्य फेरी गाठली.

जयराम याने कॅनडाच्या शेआंग झिओदोंग याच्यावर २६-२४, २१-१७ अशा संघर्षपूर्ण लढतीनंतर मात केली. तीस वर्षीय खेळाडू जयराम याला उपांत्य फेरीत सातव्या मानांकित युई इगाराशी याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. मंजुनाथ याला चीनच्या झोऊ झेकी याच्याविरुद्ध १७-२१, २१-१९, २१-११ असा विजय मिळविताना चिवट झुंज द्यावी लागली. त्याला पुढच्या फेरीत इंडोनेशियाच्या शेशार हिरेन रुस्तोव्हितो याच्याशी झुंजावे लागणार आहे.

माजी राष्ट्रीय विजेता रितुपर्ण दास याला थायलंडच्या फितायापेर्न चैवान याने २१-१९, २१-१४ असे पराभूत केले.

 

 

First Published on August 11, 2018 3:44 am

Web Title: jayaram mithun enter semi finals of vietnam open