04 March 2021

News Flash

जर्मन खुली बॅडमिंटन स्पर्धा : जयराम, शुभंकरकडे भारताचे नेतृत्व

मुंबईच्या जयरामने गेल्या वर्षी व्हिएतनाम खुल्या सुपर १०० स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारली होती.

| February 26, 2019 03:15 am

अजय जयराम

नवी दिल्ली : भारताचे बॅडमिंटनपटू अजय जयराम आणि शुभंकर डे यांच्याकडे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

गतजागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या जयरामची सध्याची कामगिरी खालावली असून मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला २०१७ मध्ये एकही स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. मुंबईच्या जयरामने गेल्या वर्षी व्हिएतनाम खुल्या सुपर १०० स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारली होती. आता दमदार कामगिरी करून या मोसमाची चांगली सुरुवात करण्यासाठी तो उत्सुक आहे. जयरामला सलामीच्या सामन्यात जपानच्या सातव्या मानांकित कांता सुनेयामा याच्याशी लढत द्यावी लागेल. गेल्या आठवडय़ात डेन्मार्कच्या विक्टर अ‍ॅक्सेलसनकडून पराभूत व्हावे लागल्याने जयरामचे आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले होते.

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पदार्पण करणाऱ्या शुभंकरने सारलोरलक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्याला सलामीच्या फेरीत थायलंडच्या कांताफोन वांगचारोएन याचा सामना करावा लागेल. या मोसमातील पाचवी स्पर्धा खेळणाऱ्या आणि जागतिक क्रमवारीत ४८व्या स्थानी असलेल्या शुभंकरला आपल्या क्रमवारीत सुधारणा करण्याची खूप चांगली संधी आहे.

महिला दुहेरीत, मेघना जाक्कामपुडी आणि पूर्विशा राम यांना पहिल्याच फेरीत मलेशियाच्या चाव मेई कुआन आणि ली मेंग यिआन यांच्याशी झुंज द्यावी लागेल. मिश्र दुहेरीत, वेंकट गौरव प्रसाद आणि जुही देवांगन यांची पात्रता फेरीतील गाठ चायनीज तैपेईच्या ली यांग आणि यांग चिंग तून यांच्याशी पडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 3:15 am

Web Title: jayaram subhankar to lead indian charge at german open badminton
Next Stories
1 अभिजित गुप्ताला विजेतेपद
2 विश्वचषक  नेमबाजी स्पर्धा : भारतीय नेमबाजांची निराशाजनक कामगिरी
3 मानधनाकडे नेतृत्व
Just Now!
X