बहरीन येथे पार पडलेल्या फॉर्मुला टू रेसमध्ये भारताच्या जेहान दारुवाला यानं इतिहास रचला आहे. साखिर ग्रां. प्री या स्पर्धेत जेहानं यांनं फार्मुटा टू रेस जिंकली आहे. अशी कामगिरी करारा जेहान पहिला भारतीय ठरला आहे. फॉर्मूला टू विजेता मिक शूमाकर आणि डेनिअल टिकटुम यांच्याविरोधातील लढतीत २२ वर्षीय जेहाननं विजय मिळवला.

रेयो रेसिंगसाठी ड्राइव्हिंग करणाऱ्या जेहानं यानं ग्रीडवर दूसऱ्या क्रमांकानं सुरुवात केली होती. तो आणि डेनियल टिकटुम सोबत होते. टिकटुमने जेहानला अनेकदा साइडला कारण्याचा प्रयत्न केला. दोघांच्या लढाईचा फायदा घेत शूमाकर पुढे निघून गेला. ही बाब जेहानच्या लक्षात आल्यानंतर त्यानं आपला स्पीड तात्काळ वाढवला. त्यानंतर जेहान यानं दोघांनाही मागे टाकत स्पर्धेवर नाव कोरलं. दुसऱ्या कर्मांकावर जपानी युकी सुनोडा राहिला. जेहान आणि युकी यांच्यामध्ये फक्त ३.५ सेकंदाचं अंतर होतं. गतविजेता टिकटुम तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला.

विजयानंतर जेहान म्हणाला की, ‘मला भारतीयांना दाखवून द्यायचं होत की, आपल्याकडे युरोपीयन ड्राइव्हरसारखी संसाधनं नसली तरी कठोर मेहनतीच्या बळावर आपण जिंकू शकतो.’

आणखी वाचा :

पांड्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाला आठवला धोनी

भारताच्या विजयावर रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला…

पांड्या म्हणतो, “सामनावीरचा खरा मानकरी मी नाही, तर…”

रोहित-बुमराहशिवाय भारतानं टी-२० मालिका जिंकली, पाहा विराट कोहली काय म्हणाला…

विराट म्हणाला, त्या शॉटबद्दल मी एबीशी चर्चा करेन; अन् एबीने दिला ‘हा’ रिप्लाय

वसीम जाफरचा फ्री हीट… ‘गँग्स ऑफ वासेपूर स्टाइल’मध्ये इंग्लंडच्या खेळाडूला केलं ट्रोल

विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये कट झाले तीन केक; पाहा व्हिडीओ