टीम इंडियाच्या महिला संघातील खेळाडू जेमायमा रॉड्रीग्ज आणि मराठमोळी स्मृती मंधाना यांनी ICC T20 Rankings मध्ये उत्तुंग झेप घेतली आहे. जेमायमाने ४ स्थानांच्या बढतीसह क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे, तर स्मृती मंधाना ४ स्थानांची बढती घेत ६व्या स्थानी विराजमान झाली आहे. या दोघींनी क्रमवारीत टॉप १० मध्ये धडक मारली आहे.
Deandra Dottin
Smriti Mandhana
Jemimah RodriguesFind out who else has advanced in the latest @MRFWorldwide ICC Women’s T20I rankings! https://t.co/SXeFW7Mu3d pic.twitter.com/wKMxh1bKDl
— ICC (@ICC) February 12, 2019
भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध टी २० मालिकेत ३-० असा दारुण पराभव पत्करावा लागला. पण महाराष्ट्रातील स्मृती आणि जेमायमा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत क्रमवारीत बढती मिळवली. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत जेमायमाने एकूण १३२ धावा लगावल्या. त्यामुळे जेमायमाच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून तिने द्वितीय स्थान मिळवले आहे. तर नुकतीच एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलेल्या स्मृतीनेही ४ स्थानांची झेप घेत सहावे स्थान पटकावले आहे. तिने या मालिकेत १८० धावा चोपल्या होत्या. स्मृतीने मालिकेत दोन अर्धशतकी खेळी केल्या. विंडीजची अष्टपैलू खेळाडू डिंड्रा डॉटिन अद्याप अव्वल स्थानी कायम आहे.
याशिवाय भारताची फिरकीपटू राधा यादव हिने ‘टॉप १०’मध्ये स्थान मिळवले आहे. तिने या मालिकेत चार बळी टिपले आणि त्यामुळे ती १८ स्थाने वर सरकली आहे. तसेच दीप्ती शर्मादेखील १४व्या स्थानी पोहोचली आहे.
संघांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम आहे, तर न्यूझीलंडने इंग्लंडकडून दुसरे स्थान हिसकावून घेतले. वेस्ट इंडिज आणि भारत अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 7:23 pm