अर्जेंटीनात सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत १५ वर्षाच्या वेटलिफ्टिर जेरेमी लालरिनुंगाने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सोमवारी रात्री उशीरा जेरेमीनने सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे. जेरेमी लालरिनुंगाने ६२ किलो वजनी गटामध्ये हा पराक्रम केला आहे. यापूर्वी वर्ल्ड युथ स्पर्धेत जेरमीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

जेरेमी लालरिनुंगाच्या सुवर्णपदकासह युथ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात चार पदके झाली आहेत. युवा जेरमीने एकूण २७४ किलो (१२४ किलो+१५० किलो) वजन उचलले. या स्पर्धेत दुसऱ्या स्थानर राहिलेल्या तुर्कीच्या टॉपटस कानेरने २६३ किलो तर तिसऱ्या स्थानावरील कोलंबियाच्या विलर एस्टिवनने २६० किलो वजन उटलले.

 Gold Morning India!!