जागतिक युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताच्या जेरेमी लालरिंन्नुन्गाने ५६ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे. इंटरनॅशन वेटलिफ्टिंग फेडरेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकाची कमाई केली. जेरेमी लालरिंन्नुन्गाने रौप्य पदक जिंकत भारताला पहिले पदक पटकावून दिले.
लालरिंन्नुन्गाने एकूण २४० किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले. युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या खेळाडूंना २०१८ च्या युवा ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होता होणार आहे. त्यामुळे युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपला मोठे महत्त्व आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 12:46 pm