अष्टपैलू खेळाडू झुलन गोस्वामीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात १७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करताना भारताचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. त्यामुळे ४४.३ षटकांत त्यांचा डाव अवघ्या १४२ धावांमध्ये कोसळला. मात्र एका बाजूने आत्मविश्वासाने खेळ करीत झुलनने ६७ चेंडूंमध्ये ५७ धावा टोलवल्या. तिचे एकदिवसीय सामन्यांमधील हे पहिलेच अर्धशतक आहे. तिने सहा चौकार व एक षटकार अशी आतषबाजी केली.   भारताकडून स्नेहा राणाने केलेल्या प्रभावी फिरकी गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा डाव ४५.३ षटकांत १२५ धावांमध्ये कोसळला. एकता राणा व हरमानप्रित कौर यांनी प्रत्येकी दोन बळी घेत तिला चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
भारत : ४४.३ षटकांत १४२ (झुलन गोस्वामी ५७; ली ताहुहु ३/२५, मोर्ना निल्सेन ३/२४, लीघ कास्पेरेक ३/३९) विजयी वि. न्यूझीलंड : ४५.३ षटकांत १२५ (सुझी बेट्स २८; स्नेहा ३/२६).