सुपरओव्हपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत ओटॅगो संघाने लायन्स संघावर मात करीत चॅम्पियन्स ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आपले आव्हान राखले.
शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना लायन्सने ४ बाद १६७ धावा केल्या. त्यामध्ये क्वीन्टन डीकोक याने पाच षटकार व दहा चौकारांसह केलेल्या १०९ धावांचा मोठा वाटा होता. ओटॅगो संघाने २० षटकांत ७ बाद १६७ धावा केल्या. त्यामध्ये जेम्स नीशाम याच्या नाबाद ५२ धावांचा वाटा होता.
दोन्ही संघांच्या समान धावा झाल्यामुळे सुपरओव्हरचा उपयोग करण्यात आला. त्यामध्ये ओटॅगोने बिनबाद १३ धावा केल्या. लायन्सनेही तेवढय़ाच धावा केल्या, मात्र त्यांचे दोन फलंदाज बाद झाल्यामुळे ओटॅगोला विजयी घोषित करण्यात आले.