भारताविरूद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला. त्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती कर्णधार जो रूट याने…. रूटने आपल्या दमदार खेळीने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर धडाकेबाज द्विशतक ठोकले. रूटच्या या खेळीमुळे इंग्लंडच्या संघाला तर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मदत मिळालीच पण त्यासह जो रूटनेजदेखील एक इतिहास रचला.

विराट की रोहित? वासिम जाफरच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

सामन्याच्या पहिल्या दिवशी डॉम सिबली आणि दुसऱ्या दिवशी अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्या साथीने जो रूटने याने संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. आपला १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या जो रूट याने आपल्या दमदार खेळीच्या जोरावर द्विशतकी मजल मारली. त्याने १९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने द्विशतक ठोकले. आपल्या १००व्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकण्याचा पराक्रम करणारा जो रूट कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला.

IND vs ENG: विराटकडून हे अपेक्षित नव्हतं- व्हीव्हीएस लक्ष्मण

त्याशिवाय, जो रूटने आणखी दोन विक्रमही केले. चेन्नईच्या कसोटीत जो रूटने कसोटी कारकिर्दीत दहाव्यांदा दीडशतकी मजल मारली आणि विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. तसंच सलग तिसऱ्यांदा दीडशतकी मजल मारणारा तो सातवा फलंदाज ठरला.