क्रिकेट हा खेळ खूपच अनिश्चित असतो. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. क्रिकेटचे नियम हे अगदी स्पष्ट आहेत आणि ते नियम काटेकोरपणे पाळले जातात. क्रिकेटच्या मैदानावर वावरताना खेळाडूंसाठी काही नियम घालून दिलेले असतात. ते नियम पाळले नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाते. पण नुकत्याच एका सामन्यात आक्षेपार्ह वर्तन केल्यामुळे चक्क चाहत्यावर शिक्षेची कारवाई करण्यात आली आहे.

विराटच्या फलंदाजीचा क्रमांक बदलणार? ‘कॅप्टन कोहली’चं सूचक वक्तव्य

इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड ही नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये झालेली कसोटी मालिका न्यूझीलंडने १-० ने जिंकली. यातील पहिला कसोटी सामना न्यूझीलंडने एक डाव आणि ६५ धावांनी जिंकला. तर दुसरा सामना अनिर्णित राहिला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात क्रिकेटपटूला शिवीगाळ केल्याप्रकरणी एका चाहत्याला २ वर्षे स्टेडियममध्ये नो एन्ट्री ची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

IND vs AUS : विराट की स्मिथ… सर्वोत्तम कोण? गंभीर म्हणतो…

न्यूझीलंड-इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या एका चाहत्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्यावर वर्णभेदी टीका केली. त्याने केलेल्या टीकेची त्याला चांगलीच किंमत चुकावावी लागली. हा प्रकार घडल्यानंतर २८ वर्षाच्या त्या इसमाचा पोलिसांनी माग घेतला आणि त्याला पकडले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर जोफ्रा आर्चरवर वर्णभेदी टिप्पणी केल्याचे आणि काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे त्या इसमाने मान्य केले, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते अँथनी क्रमी यांनी दिली. न्यूझीलंडच्या चाहत्याने केलेल्या आक्षेपार्ह वर्तणुकीबाबत आम्ही जोफ्रा आर्चरची आणि इंग्लंड क्रिकेट मंडळाची क्षमा मागतो, असेही त्यांनी सांगितले.