19 September 2020

News Flash

विश्वचषकासाठी संघातील स्थानाचा तणाव नाही

डबलीनमध्ये झालेल्या आर्यलडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने चार गडी राखून विजय मिळवला.

इंग्लंडच्या संघात माझे अत्यंत आत्मीयतेने स्वागत झाले. मात्र, विश्वचषकासाठीच्या संघनिवडीत मला संघात स्थान मिळाले नाही, तरी मी त्याचा फारसा ताण करून घेणार नाही, असे मत इंग्लंडच्या संघाकडून पहिलाच एकदिवसीय सामना खेळलेल्या जोफ्रा आर्चरने व्यक्त केले.

डबलीनमध्ये झालेल्या आर्यलडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने चार गडी राखून विजय मिळवला. या सामन्याच्या माध्यमातून इंग्लंड संघात आगमन केलेल्या आर्चरने मार्क अडेरला ९० किलोमीटर प्रति तास वेगाने यॉर्कर टाकत त्याचा पहिला बळी मिळवला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने इंग्लंड संघातील प्रवेशासाठीची पात्रता इंग्लंडमधील रहिवास ७ वर्षांहून कमी करीत ३ वर्षे इतकी केल्यानंतरच आर्चरला इंग्लंडच्या संघात प्रवेश मिळू शकला. ससेक्स परगण्याकडून इंग्लंडमध्ये खेळणाऱ्या आर्चरने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी बजावत स्वत:चा ठसा उमटवला.

आर्चरचे संघात आगमन झाल्यास डेव्हिड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड यांच्यापैकी एकाच्या स्थानावर गंडांतर येण्याची चर्चा होती. त्या पाश्र्वभूमीवर बोलताना आर्चरने कुणाशीही स्पर्धा नसल्याचे सांगितले. ‘‘मला या संघात अत्यंत प्रेमाने स्थान मिळाले असून मिळालेल्या संधीवर मी समाधानी आहे. इंग्लंड संघातील अनेक खेळाडू प्रदीर्घ काळापासून एकमेकांसमवेत खेळत आहेत.

त्यामुळे त्यांचा समावेश संघात असणे साहजिक आहे. विश्वचषकाच्या संघात आपला समावेश असावा, असे कुणालाही वाटणार. त्यामुळे मी केवळ चांगला खेळ करून संघातील समावेशासाठी प्रयत्न करणार, पण नावाचा समावेश झाला किंवा नाही झाला तरी त्याचे फारसे वाईट वाटून घेणार नाही. मी सध्या चांगली कामगिरी केली तर काही दिवसांनी निवड होणाऱ्या इंग्लंडच्या विश्वचषक संघात माझे नाव निश्चितपणे असेल, पण मी त्यावरच लक्ष केंद्रित केलेले नाही,’’ असे आर्चरने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 11:23 pm

Web Title: jofra archer on icc world cup 2019
Next Stories
1 टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्याचे ध्येय!
2 सेल्टा व्हिगोकडून बार्सिलोना पराभूत
3 Video : दिनेश कार्तिकने घेतलेला हा अफलातून झेल पाहिलात का?
Just Now!
X