विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अंतिम संघात इंग्लंडने आज अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चरला संधी दिली आहे. जोफ्रा अर्चरला विश्वचषकाचे तिकीट मिळाल्यानंतर आयपीएलमधील राजस्थान रॉयल संघाने आमच्या पेस मशीनला विश्वचषकात संधी असे ट्विट केले.

राजस्थानच्या ट्विटनंतर इतर दोन संघामध्ये ट्विटरवर चर्चा सुरू झाली. जोफ्रा आर्चर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल संघाचे प्रतिनिधित्व करतो. इंग्लंड काऊंटीकडून खेळताना ससेक्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. होबार्ट हेरिकेन्सकडूनही खेळतो. त्यामुळे जोफ्रा आर्चरची विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर या तिन्ही संघात श्रेय घेण्यावरून ट्विटरवर वादंग सुरू झाले. अखेर हे सर्व पाहून जोफ्रा आर्चरने शांत राहण्याचा सल्ला दिला.

 

इंग्लंडने १५ सदस्यीय प्राथमिक चमू जाहीर केला होता. त्यात अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चर याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. पण नुकत्याच झालेल्या आयर्लंड व पाकिस्तानविरुद्धच्या मालिकांमध्ये त्याला संधी देण्यात आली होती. त्या मालिकांमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर आर्चरला संधी मिळाली. त्याच्याबरोबरच लिअम डॉसन आणि जेम्स विन्स या दोघांनाही संधी देण्यात आली आहे.

इंग्लंडचा विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा अंतिम संघ

ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.