News Flash

दुखापतीमुळे आर्चरची माघार

एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

अहमदाबाद : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. इंग्लंडने १४ सदस्यीय संघातून आर्चरचे नाव वगळले आहे.

२५ वर्षीय आर्चरच्या उजव्या कोपराला दुखापत झाली असून, पुण्यात २३ मार्चपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत तो खेळणार नाही. उपचारासाठी त्याला मायदेशी परतावे लागणार आहे, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) रविवारी स्पष्ट केले आहे. जेक बॉल, ख्रिस जॉर्डन आणि डेव्हिड मलान हे तीन राखीव खेळाडू इंग्लंडच्या एकदिवसीय संघासह पुण्याकडे रवाना होणार आहेत.

‘आयपीएल’च्या सुरुवातीच्या टप्प्यालाही मुकणार

आर्चर ‘आयपीएल’च्या सुरुवातीच्या टप्प्यालाही मुकणार आहे, असे रविवारी इंग्लंड क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले. ९ एप्रिलपासून ‘आयपीएल’ला प्रारंभ् होत असून, आर्चर सुरुवातीच्या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळू शकणार नाही, असे ‘ईसीबी’ने म्हटले आहे.

इंग्लंडचा संघ

इऑन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जोनाथन बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीसी टॉपले, मार्क वूड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 12:55 am

Web Title: jofra archer ruled out of odi series against india zws 70
Next Stories
1 जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिका : भारत लिजंड्सला जेतेपद
2 भारत-आफ्रिका क्रिकेट मालिका : भारताचा सलग दुसरा पराभव
3 ट्वेन्टी-२० विश्वचषकात रोहित-विराट सलामीला!
Just Now!
X