इंग्लंड-विंडीज आणि आयर्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत, विंडीजच्या जॉन कॅम्पबेल आणि शाई होप जोडीने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दोन्ही खेळाडूंनी वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक भागीदारी करणाऱ्या सलामीवीरांच्या जोडीत पहिलं स्थान मिळवलं आहे. कॅम्पबेल-होप जोडीने आयर्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेत पहिल्या विकेटसाठी ३०६ धावा केल्या. त्यांनी पाकिस्तानच्या फखार झमान-इमाम उल-हक जोडीचा विक्रम मोडला.

वन-डे क्रिकेटमध्ये सलामीच्या जोडीसाठी सर्वोत्तम भागीदारी करणारे फलंदाज –

शाई होप-जॉन कॅम्पबेल – ३६५ धावा : (विरुद्ध आयर्लंड, डबलिन, २०१९)

फखार झमान-इमाम उल-हक – ३०४ धावा : (विरुद्ध झिम्बाब्वे, बुलावायो २०१८)

सनथ जयसूर्या-उपुल थरंगा – २८६ धावा : (विरुद्ध इंग्लंड, लीड्स २००६)

मात्र वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम मोडणं त्यांना जमलं नाही. अवघ्या ७ धावांनी होप-कॅम्पबेल जोडीचा हा विक्रम हुकला. ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल्स या विंडीज जोडीने २०१५ साली झिम्बाब्वेविरुद्ध केलेली ३७२ धावांची भागीदारी वन-डे क्रिकेटमधली सर्वोत्तम भागीदारी आहे.

वन-डे क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदाऱ्या पुढीलप्रमाणे –

ख्रिस गेल – मार्लन सॅम्युअल्स : ३७२ धावा

शाई होप – जॉन कॅम्पबेल : ३६५ धावा

सचिन तेंडुलकर – राहुल द्रविड : ३३१ धावा

सौरव गांगुली – राहुल द्रविड : ३१८ धावा