14 October 2019

News Flash

बेअरस्टोच्या शतकापुढे पाकिस्तान नेस्तनाबूत!

बेअरस्टो ९३ चेंडूंत  १५ चौकार व पाच षटकारांसह १२८ धावा फटकावून बाद झाला.

ब्रिस्टोल : नुकताच झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणाऱ्या जॉनी बेअरस्टोने इंग्लंडमध्येही फलंदाजीचा धडाका कायम राखला आहे. त्याने साकारलेल्या तुफानी शतकाच्या बळावरच इंग्लंडने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा सहा गडी आणि ३१ चेंडू राखून धुव्वा उडवला.

पाकिस्तानने दिलेले ३५९ धावांचे लक्ष्य इंग्लंडने अवघ्या चार फलंदाजांच्या मोबदल्यात ४४.५ षटकांत सहज गाठले. त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इमाम-उल-हकच्या १३१ चेंडूंतील १५१ धावांच्या दिमाखदार खेळीमुळे पाकिस्तानने ५० षटकांत ९ बाद ३५८ धावांचा डोंगर उभारला. आसिफ अली (५२) आणि हॅरिस सोहेल (४१) यांनी त्याला सुरेख साथ दिली.

३५९ धावांचा पाठलाग करताना बेअरस्टो आणि जेसन रॉय (७६) यांनी १५९ धावांची सलामी देत दमदार सुरुवात केली. बेअरस्टो ९३ चेंडूंत  १५ चौकार व पाच षटकारांसह १२८ धावा फटकावून बाद झाला. त्यानंतर जो रूट (४३) व बेन स्टोक्स (३७) यांनी संयमी फलंदाजी करून इंग्लंडचा विजय साकारला.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : ५० षटकांत ९ बाद ३५८ (इमाम-उल-हक १५१, आसिफ अली ५२; ख्रिस वोक्स ४/६७) पराभूत वि. इंग्लंड : ४४.५ षटकांत ४ बाद ३५९ (जॉनी बेअरस्टो १२८, जेसन रॉय ७६; जुनैद खान १/५७).

First Published on May 16, 2019 3:27 am

Web Title: jonny bairstow smashed century as england chase of 359 to beat pakistan