15 January 2021

News Flash

जॉन्टी ऱ्होड्सने जाहीर केले सर्वोत्तम ५ क्षेत्ररक्षक, ‘या’ भारतीय खेळाडूला मिळालं स्थान

दोन द. आफ्रिकेच्या खेळाडूंनाही स्थान

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्स हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानला जातो. 1992 च्या विश्वचषकात इंझमाम उल हकला जॉन्टीने हवेत झेप घेऊन केलेलं धावबाद अजुनही क्रिकेट प्रेमींच्या स्मरणात आहे. आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलत असताना जॉन्टी ऱ्होड्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले सर्वोत्तम ५ क्षेत्ररक्षक सांगितले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या यादीत भारताच्या केवळ एका खेळाडूला स्थान मिळालं आहे. सुरेश रैनाच्या क्षेत्ररक्षण कौशल्यावर जॉन्टी ऱ्होड्स चांगला प्रभावित झालेला आहे.

ऱ्होड्सच्या मते ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अँड्रू सायमंड्स हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. सायमंड्स हा सीमारेषेवर आणि 30 यार्ड सर्कलच्या आत कुठेही व्यवस्थित चेंडू अडवू शकतो असं ऱ्होड्स म्हणाला. यानंतर जॉन्टीने आपले दक्षिण आफ्रिकी सहकारी हर्षेल गिब्ज आणि एबी डीव्हिलीयर्स याचसोबत इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूडलाही सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हटलं आहे. भारताच्या सुरेश रैनालाही जॉन्टीने सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांच्या यादीत स्थान दिलंय. भारतामध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षक शोधणं कठीण असल्याचंही जॉन्टीने मान्य केलं. मात्र भारतात आणि भारताबाहेर केलेल्या कामगिरीच्या जोरावर सुरेश रैना सर्वोत्तम असल्याचंही जॉन्टीने म्हटलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2019 1:15 pm

Web Title: jonty rhodes reveals suresh raina and four others as all time best fielders
Next Stories
1 विदर्भाच्या अक्षय कर्णेवारची ‘दुहेरी’ गोलंदाजी, पंचही पडले बुचकळ्यात
2 IPL 2019 : चुका प्रत्येकाकडून होतात, स्मिथचं संघात स्वागत – अजिंक्य रहाणे
3 कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी? विचारही नको….गांगुलीचा रवी शास्त्रींना सल्ला
Just Now!
X