दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रख्यात क्षेत्ररक्षक अशी ओळख मिळवलेल्या जॉन्टी ऱ्होड्सने नवीन जबाबदारी स्विकारली आहे. जॉन्टी ऱ्होड्स स्वीडनच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. स्विडीश क्रिकेट फेडरेशनने जॉन्टी ऱ्होड्ससोबत करार केला आहे. सध्याच्या घडीला स्वीडनमध्ये क्रिकेट हा दुसऱ्या पसंतीचा खेळ मानला जातो. त्यामुळे स्वीडनमधील तरुण खेळाडूंना जॉन्टी ऱ्होड्सच्या अनुभवाचा फायदा होईल असं स्विडीश क्रिकेट फेडरेशनने म्हटलं आहे.
“माझ्या परिवारासोबत स्वीडनमध्ये जायला मी उत्सुक आहे. माझ्यासाठी अगदी योग्य वेळेला ही संधी आलेली आहे. नवीन वातावरण आणि नव्या उमेदीच्या खेळाडूंसोबत काम करायला आणि त्यांना मार्गदर्शन करायला मला आवडेल. मी लवकरच स्वीडन संघासोबत काम करण्यास उत्सुक आहे.” swedishcricket.org शी बोलताना जॉन्टीने आपली प्रतिक्रिया दिली. जॉन्टी ऱ्होड्स सध्या युएईत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम करतो आहे. नोव्हेंबर महिन्यात तो स्वीडनला परिवारासोबत रवाना होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2020 5:01 pm