दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी ऱ्होड्स हा त्याच्या काळातील एक उत्तम फिल्डर म्हणून ओळखला जायचा. आजही ऱ्होड्स ज्या ज्या संघांना फिल्डींगचे प्रशिक्षण देतो, ते संघ मैदानावर दमदार कामगिरी करताना दिसतात. मुंबई इंडियन्स हा IPL मधील संघ याचे एक उदाहरण आहे. पण तोच जॉन्टी ऱ्होड्स सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या काळात जसा जॉन्टी ऱ्होड्स फिल्डींगमध्ये अव्वल होता, तसा सध्याच्या घडीला भारताचा रवींद्र जाडेजा हा फिल्डींगमध्ये अव्वल मानला जातो. जॉन्टी ऱ्होड्सलादेखील हे मान्य आहे. पण ऱ्होड्सने केलेल्या एका ट्विटमुळे त्याला ट्रोल व्हावं लागलं.

…मग कशाला गेलात न्यूझीलंडमध्ये ‘वन-डे’ खेळायला? नेहरा विराटवर संतापला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एक क्रिकेट मालिका रंगली होती. त्या क्रिकेट मालिकेत रवींद्र जाडेजाने फिल्डींग तर अप्रतिम केलीच, पण त्याचसोबत फलंदाजीतही आपली कमाल दाखवून दिली. त्यानंतर जॉन्टी ऱ्होड्सने ट्विट केले होते की जेव्हा फिल्डर चांगली फलंदाजी करतो, तेव्हा चांगलं वाटतं. त्याच्या या ट्विटवर एका चाहत्याने त्याला लगेच रिप्लाय दिला की जाडेजा केवळ फिल्डरच नाही, तर तो एक उत्तम गोलंदाज आणि फलंदाजदेखील आहे. ICC च्या क्रमवारीत त्याने अनेकदा अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल असलं काही बोलू नको. तु स्वत: क्रमवारीत कोणत्या प्रकारात एकेरी आकडेवारीत आला होतास ते सांग, असा सवाल त्या चाहत्याने ऱ्होड्सला विचारला होता.

“…म्हणून सुरेश रैना अजूनही संघाच्या बाहेर आहे”

त्यानंतर ऱ्होड्सने त्याला पुढच्याच ट्विटमध्ये जाडेजा उत्तम फिल्डर असल्याचे मान्य करत मी मजेत तसं म्हणालो होतो असं स्पष्टीकरण दिलं होतं.